Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधानांचे पवित्र कुंभात स्नान; सफाई कर्मचार्‍यांचे पाद्यपूजन !

प्रयागराज वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर पवित्र कुंभ स्नान केेले. याप्रसंगी त्यांनी सफाई कर्मचार्‍यांचे पाद्यपूजन करून त्यांना अनोखा सन्मान दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुंभाच्या कालखंडात गंगेत डुबकी घेणार असल्याची माहिती आधीच समोर आली होती. या अनुषंगाने आज दुपारी पंतप्रधानांनी प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर स्नान केले. याआधी त्यांनी पाच सफाई कर्मचार्‍यांचे पाद्यपूजन केले. त्यांनी या सर्व सफाई कर्मचार्‍यांचे पाय स्वच्छ करून त्यांना वंदन केले. यात तीन महिला तर दोन पुरूष कर्मचार्‍यांचा समावेश होता. यानंतर त्यांनी संगमावर डुबकी घेऊन स्नान केले.

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, आपली हिंदुत्ववादी प्रतिमा अजून पक्की करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी कुंभ स्नान केल्याचे मानले जात आहे.

Exit mobile version