Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्ता आडवून मोबाईल व रोकड जबरी लांबविली

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  दुचाकीने घरी जात असलेल्या एकाला अज्ञात तीन जणांनी रस्ता अडवून मोबाईल व पाच हजाराची रोकड असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरून नेल्याची घटना तालुक्यातील चोपडाई गावाजवळ घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, उदय नथू कापडणे (वय-५०) रा. डांगर ता.अमळनेर हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात.  मंगळवार २९ मार्च रोजी १२ वाजेच्या सुमारास ते धुळे येथील किर्तनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने घरी येत होते. अमळनेर तालुक्यातील चोपडाई गावाजवळ दुचाकीवरून येत असताना अज्ञात तीन जणांनी त्यांची दुचाकी अडवली  व जबरी त्यांच्या हातातील मोबाईल आणि ५ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी उदय कापडणे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहे.

 

Exit mobile version