Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेहरूण तलाव येथे तरूणांच्या बॅगांसह मोबाईल व रोकड लांबविले

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेहरून तलावासमोर रनिंग करण्यासाठी आलेल्या तरुणांच्या बॅगा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. यात मोबाईल आणि रोकड असा एकुण २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत माहिती अशी की, विकी नागेश मुंडोकार (वय-२५) रा. महादेव मंदिराजवळ मेहरूण हा तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याने तो दररोज मेहरूण तलाव येथे मित्रांसोबत रनिंग करण्यासाठी जात असतो. दैनंदिनीप्रमाणे १७ मार्च रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास विकी मुंडोकार हा त्याचा मित्र राधेश्याम नारायण चांदेकर रा. समतानगर, राकेश अरुण पाटील रा. रायसोनी नगर आणि अंकित बाळकृष्ण कापुरे रा. श्याम नगर, शिव कॉलनी असे रनिंग करण्यासाठी मेहरुन तलाव येथे गेले.  तेथील मेहरून तलावाजवळील कृष्णलॉनच्या  मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर त्यांनी दुचाक्या लावल्या आणि तेथेच बॅगा ठेवून रनिंग करण्यासाठी ट्रॅकवर गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तेथे ठेवलेल्या चौघांच्या बॅगा चोरून नेल्या. चौघांनी परिसरात शोधाशोध केली परंतु कुठेही बँगा आढळून आल्या नाही. यात विकी मुंडोकार याचा १४ हजाराचा मोबाईल आणि राधेश्याम चांदेकर याचे १४ हजाराची रोकड असा एकुण २८ हजाराचा मुद्देमाल लांबविला. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात विकी मुंडोकार यांच्यासह त्याच्या मित्रांनी धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अल्ताफ पठाण करीत आहे.

 

Exit mobile version