Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात बुधवारी मनसेचे ‘नळ तोटी’ आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जुन्या अपार्टमेंट धारकांना एक नळ कनेक्शन द्यावे या महापालिकेच्या निर्णयाविरोधात मनसेची जयकीसनवाडी येथील पद्मालर विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली. यात बुधवार २२ जून रोजी नळ तोटी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांची सांगितले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरामध्ये अमृत योजनेद्वारा मुबलक पाणी मिळणार असल्याची घोषणा महानगरपालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी केली, मात्र आत्तापर्यंत जुन्या अपार्टमेंटधारकांना नळ कनेक्शन मिळालेले नाही. जुने अपार्टमेंट धारकांना एकच कनेक्शन देण्यात येईल, असे मनपा प्रशासन सांगत आहे. त्याद्वारे सगळ्यांनी पाणीपुरवठा घ्यावा, या महापालिकेच्या धोरणाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामार्फत जळगाव शहरांमधील जुन्या अपारमेंटधारकांची बैठक रविवारी १९ जून रोजी सकाळी ११ वाजता जयकिसनवाडी येथील पद्मालय विश्रामगृह येथे संपन्न झाली.

 

प्रत्येकाला पाणी मिळणे हा मूलभूत हक्क आहे. आणि या मूलभूत हक्काची पायमल्ली होत असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे यांनी दिली आहे. नवीन अमृत योजनेची कनेक्शन न देता जुने पाणी कनेक्शन तोडल्या गेल्याचे गंभीर उदाहरण शहरांमध्ये आहेत. अनेक अपार्टमेंट  ला गुपचूप रित्या स्वतंत्र नळ कनेक्शन दिले असल्याची माहिती पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहे. याबाबत मनपा प्रशासनाला जागे करण्याकरता व जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष वेधणे करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नळ-तोटी आंदोलन करण्यात येईल असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला.

 

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट जमील देशपांडे शहराध्यक्ष विनोद शिंदे उपशहर अध्यक्ष आशिष सपकाळे रस्ते अस्थापना विभागाचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम योगेश पाटील उपशहर अध्यक्ष संदीप पाटील, संदीप पांडुळे, महेश माळी, ललित शर्मा, अविनाश जोशी, सागर पाटील, साजन पाटील, विकास पाथरे उपस्थित होते..

Exit mobile version