Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पावर फ्रंट युनियनच्या कंत्राटी कामगारांच्या आमरण उपोषणाला मनसेचा पाठिंबा

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील शिवतीर्थ मैदान येथे २६ जानेवारीपासून महावितरणच्या कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी पावर फ्रंट युनियनचे आमरण उपोषण सुरू असून या आंदोलनाला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे.

महावितरणच्या कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन केला जाईल असा इशारा उपमहानगर प्रमुख अशीष सपकाळे यांनी दिला आहे. या पाठिंबा प्रसंगी आज बुधवार ३१ जानेवारी रोजी कोट चौकातील शिवतीर्थ मैदान येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पावर फ्रंट कंत्राटी युनियनच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगर प्रमुख आशिष सपकाळे, शहर संघटक राजेंद्र निकम, महानगर संघटक श्रीकृष्ण मेंगडे आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.

Exit mobile version