Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनसे आमदार राजू पाटील यांच्या कारचा अपघात

car 1

मुंबई वृत्तसंस्था । मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील गाडीचा डोंबिवलीमध्ये अपघात झाला. गाडी भरधाव वेगाने उड्डाणपुलावरून थेट कोकण रेल्वे रुळावर कोसळली. रात्री साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. यात कारचे नुकसान झाले असून कोणतीही जिवित हानी झाली नसल्याचे समजते.

याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातात राजू पाटील यांच्या ७५ लाखांच्या आलिशान कारचा चक्काचूर झाला आहे. राजू पाटील यांची कार निळजे आणि दातीवली रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या रोड ब्रिजवरुन खाली रेल्वे रुळांवर कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. विशेष म्हणजे, अपघात झाला त्यावेळी सुदैवाने कोणतीही रेल्वे रुळावरून ये-जा करीत नव्हती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. खदिर इमामदार असे आमदार राजू पाटील यांच्या चालकाचे नाव असून तो आपल्या नातेवाईकाला डोंबिवली येथे सोडून पुन्हा पलावासिटीकडे येत होता. त्यावेळी कारवरचे नियंत्रण सुटून ती थेट दिवा पनवेल रेल्वे रुळावर कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार रेल्वे रुळांवरून हटवण्यात आली.

Exit mobile version