Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मनसेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

पाचोरा, लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करत शिवजयंती साजरी केली.

मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ व सिध्दीविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ.स्वप्नील पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी शिवचरित्रही वाटप करण्यात आले. नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही रक्तदान केले.

यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष फहीम शेख, तालुकाध्यक्ष शुभम पाटील, शहराध्यक्ष ऋषिकेश भोई, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, शहर उपाध्यक्ष रोहित पाटील व यश रोकडे, शहर संघटक हर्षल अहिरे, शहर सरचिटणीस श्रीकृष्ण दुंदुले, वाल्मीक जगताप, शुभम मोरे, स्वप्नील पाटील, शुभम बोरसे, पंकज चौधरी, दीपक गोरखा, आकाश गोसावी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version