Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोटनिवडणुकीत मनसेचा भाजपला पाठींबा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मनसेने भाजपला आपला पाठींबा जाहीर केला आहे.

कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. या दोन्ही ठिकाणी पक्षाची प्रतिष्ठा पणास लागलेली आहे. महाविकास आघाडीने बिनविरोधसाठी नकार दिल्याने दोन्ही ठिकाणी जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेते आधीच या दोन्ही ठिकाणी उमेदवार दिले नव्हते. यानंतर राज ठाकरे यांची नेमकी काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या पार्श्‍वभूमिवर, राज ठाकरे यांनी अखेर भारतीय जनता पक्षाला पाठींबा जाहीर केला आहे. भाजपच्या नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तथापि, मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट भाजप उमेदवारांचा प्रचार करणार की नाही ? याबाबत त्यांनी भाष्य केले नाही.

Exit mobile version