Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हनुमान जयंतीनिमित्त भव्य मिरवणूकीत आमदारांनी धरला ठेका.      

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात ठिकठिकाणी अंजनीसुत, पवनपुत्र, केसरीनंदन, रामभक्त हनुमान यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमिताने विविध ठिकाणी सार्वजनिक भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील बजरंग पुरा भागात सायंकाळी हनुमानजी यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, समाधान वाघ, राष्ट्रवादी शहराध्यक्ष पप्पू पाटील, संतोष आवटे, प्रदीप गायके यांच्यासह विविध संघटनांचे व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राम भक्तांसह आमदार गिरीश महाजन यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला.

Exit mobile version