Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार रोहित पवारांना काहीही नॉलेज नाही – माजी मंत्री राम शिंदे

नगर । आमदार रोहित पवार यांना काहीही नॉलेज नसताना ते कर्जत जामखेडमध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आरोग्य विभागात राजकीय हस्तक्षेप करून, अनेक नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. अशी गंभीर टिका माजी मंत्री राम शिंदे यांनी केली आहे. कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय येथे कोरोना कोविड सेंटरला माजी मंत्री राम शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे असलेले रुग्ण त्यांची असलेली सर्व व्यवस्थेची पाहणी केली.

कर्जतमध्ये उभारण्यात आलेल्या एका कोविड केअर सेंटरची पाहणी करण्यासाठी राम शिंदे आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. आमदार पवार यांचे नाव न घेता त्यांनी निशाणा साधला. जामखेड तालुक्यातील एका आरोग्य अधिकाऱ्याच्या बदलीची पार्श्वभूमी यामागे आहे. काही अडचण आली तर थेट आपल्याशी संपर्क साधा, असा सल्लाही त्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिला. शिंदे म्हणाले, ‘कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात करोना संसर्गाने थैमान घातले आहे. अशावेळी काही नॉलेज नसलेल्या व्यक्ती राजकीय दृष्टीकोनातून आरोग्य विभागाच्या कामात हस्तक्षेप करीत आहेत. यामुळे आपण लोकांच्या जीवाशी खेळत आहोत, याचा विसरही त्यांना पडला आहे. सध्याच्या परिस्थितीत डॉक्टर व प्रशासन यांना काम करू द्यावे. त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान व अनुभव महत्त्वाचा असतो. तरीही काही जण यात हस्तक्षेप करीत आहेत, हे योग्य नाही. सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर करोनाच्या चाचण्या होत नाहीत. त्या करून रुग्णांवर तातडीने उपचार होणे आवश्यक आहे, हा खरा करोना नियंत्रणात ठेवण्याचा पर्याय आहे.’ असेही शिंदे म्हणाले.

Exit mobile version