Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा

औरंगाबाद । येथील शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात सहा महिन्यांची शिक्षा आणि अडीच हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

११ आणि १२ मे २०१८ रोजी औरंगाबादमध्ये  झालेल्या दंगलीप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी गांधीनगर येथील दोन तरुणांना अटक केली. याविषयी माहिती मिळताच रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास औरंगाबाद मध्यचे शिवसेना पक्षाचे आमदार आ. प्रदीप जैस्वाल हे क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी तेथे तुम्ही पोलीसवाले शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना अटक करीत आहेत. तुम्ही व तुमचे वरिष्ठ अधिकारी आमच्या पक्षालाच त्रास देत आहेत, असे म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना त्यांनी शिवीगाळ केली. उद्या शहरामध्ये काय घडते ते बघा, अशी धमकी दिली. त्याचवेळी त्यांनी पेन स्टॅण्डने टेबलावरील काच फोडली.  या घटनेनंतर वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल पोटे यांनी जैस्वालविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचार्‍यांना धमकावणे आणि अन्य कलमांनुसार गुन्हा नोंदविला.

या प्रकरणात त्यांना तीन दिवस न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक अजय सुर्यवंशी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यातआमदार प्रदीप जैस्वाल यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा महिन्यांची शिक्षा व दंड २५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Exit mobile version