आ. मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांना आज न्यायालयात हजर करणार

जळगाव प्रतिनिधी । वीज परिमंडळ कार्यालयात अधिक्षक अभियंत्यासोबत गैरवर्तन करण्याच्या आरोपातून अटक करण्यात आलेले चाळीसगावचे MLA Mangesh Chavan आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांवर काल सायंकाळी औद्योगीक वसाहत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शुक्रवार दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी जळगावच्या सहकार औद्योगीक वसाहतीमध्ये असणार्‍या वीज परिमंडळाच्या कार्यालयात चाळीसगावचे MLA Mangesh Chavan आमदार मंगेश चव्हाण हे तालुक्यातील शेतकर्‍यांसह अधिक्षक अभियंता मोहंमद फारूक यांच्या भेटीसाठी आले. याप्रसंगी त्यांनी तालुक्यातील सात हजार शेतकर्‍यांच्या वीजचे कनेक्शन तोडल्याबद्दल विचारणा केली. याप्रसंगी फारूकी यांना हमरातुमरी करण्यात आली. त्यांना खुर्चीला बांधून थेट शेतकर्‍यांच्या बांधावर नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र एमआयडीसी पोलीस पोहचल्याने हे शक्य झाले नाही. तसेच आंदोलकांनी वीज परिमंडळ कार्यालयात कुलूप ठोकले.

या प्रकरणी लागलीच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात आमदार मंगेश चव्हाण आणि त्यांच्या सोबतच्या लोकांचा समावेश होता. तर रात्री या संदर्भात औद्योगीक वसाहत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अभियंता फारुक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार चव्हाण यांच्यासह ४० ते ५० जणांवर भारतीय दंड विधान कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४९, ३५१, २९४, २६९, १८८, मुंबई पोलिस कायदा कलम १३५ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनुषंगाने आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

MLA Mangesh Chavan आमदार मंगेश चव्हाण आणि इतरांवर लावण्यात आलेली कलमे पाहता त्यांच्यासह इतरांची पोलीस कोठडी मागण्यात येईल असे मानले जात आहे. यामुळे आता न्यायालयात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content