Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवडमध्ये आ. चंद्रकांत पाटलांच्या हस्ते ११ कोटींच्या विकास कामांचे भूमीपुजन

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर करण्यात आलेल्या तब्बल ११ कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपुजन करण्यात आले.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने मतदारसंघाच्या कान्याकोपर्‍यात विकासकामांचा झंझावात सुरू आहे. यात नागरी भागाचा विचार केला असता सावदा, मुक्ताईनगर आणि बोदवड या तिन्ही नगरपालिकांच्या अंतर्गत विविध विकासकामे मंजूर करण्यात आली असून याची कामे सुरू आहेत. या अनुषंगाने आ. पाटील यांच्या पाठपुराव्याने बोदवड शहरासाठी तब्बल १० कोटी रूपयांची कामे मंजूर करण्यात आली असून शनिवारी यांचे ठिकठिकाणी भूमिपुजन करण्यात आले.

हे देखील वाचा : आ. चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याने बोदवडच्या तलावाची होणार सफाई

आमदार चंद्रकांत पाटील यांचे बोदवड शहरात आगमन होताच ठिकठिकाणी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरामध्ये अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर त्यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपुजन झाले. यात रस्ता कॉंक्रिटीकरण, गटारी आदींसह अन्य कामांचा समावेश आहे.

याप्रसंगी नगराध्यक्ष आनंदा पाटील, उपनगराध्यक्षा रेखा गायकवाड, नगरसेवक सईद बागवान, विजय बडगुजर, मुख्याधिकारी गजानन तायडे, तसेच नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Exit mobile version