Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. चंद्रकांत पाटलांनी अपघातग्रस्त महिलेस आपल्या वाहनातून केले रवाना !

मुक्ताईनगर-पंकज कपले | आमदार चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यात दिसलेल्या अपघातग्रस्त महिलेस आपल्या स्वत:च्या वाहनातून रूग्णालयात रवाना केल्याची घटना आज घडली आहे.

आमदार चंद्रकांत पाटील हे आज कामानिमित्त मुक्ताईनगर येथून बोदवडला जात होते. त्यांना रस्त्यात एक महिला अपघातग्रस्त झाल्याचे दिसून आले. दुचाकीवरून पडल्याने ती महिला जखमी झाली होती. दरम्यान, अपघातग्रस्त महिलेस पाहताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपला ताफा थांबवून तात्काळ आपल्या वाहनातून त्या महिलेस उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी रवाना केले.

आमदार चंद्रकांत पाटील यांना कोणतेही वाहन थांबवून अपघातग्रस्त महिलेस रूग्णालयात पाठविणे शक्य असतांना त्यांनी स्वत:च्या वाहनातून त्या महिलेस उपचारासाठी पाठविले. यानंतर ते स्वत: दुसर्‍या वाहनाने कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना झाले हे विशेष !

Exit mobile version