Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागातर्फ मिशन साहसी कार्यशाळा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावल युवती सभा व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन साहसी कार्यशाळा संपन्न झाली. ६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेचे पहिले पुष्प डॉ. वैशाली निकुंभ वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय यावल यांनी गुंफले. स्री आरोग्य विषयक जागृती आणि उपाय योजना या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर गट चर्चेद्वारे प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम झाला. कार्यशाळेचे दुसरे पुष्प गोपाळ बन्सी जोनवाल ट्रेनर यांनी गुफले. त्यांनी स्वसंरक्षण व कराटे प्रात्यक्षिक विद्यार्थिनींना करून दाखविले व करून घेतले.

तेजस संजय गडे यांनी कृषी विषयक जागृती या विषयावर मार्गदर्शन केले. बालाजी ऍग्रो इंडस्ट्रीज येथे क्षेत्रभेट देऊन विद्यार्थिनींनी कृषी विषयक उपकरणांची माहिती करून घेतली. कार्यशाळेच्या चौथ्या दिवशी सुरेखा अशोक काटकर योगा शिक्षक यांनी योगाचे महत्त्व कलागुण आणि योगाचे प्रात्यक्षिक विद्यार्थिनींना करून दाखवले. समारोपाच्या दिवशी ॲड. अजय कुलकर्णी यांनी सायबर क्राईम कायदेविषयक माहिती विद्यार्थ्यांना दिली.

समारंभाचे प्रमुख अतिथी सिनेट सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ डॉ. पी. डी. पाटील यांनी महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संध्या सोनवणे यांनी विद्यार्थिनींना अनेक महिलांची उदाहरणे देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. उपप्राचार्य ए. पी. पाटील यांनी कार्यशाळेत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. निर्मला पवार यांनी केले. तसेच प्रास्ताविक डॉ. एस. पी. कापडे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन प्रा. रजनी इंगळे यांनी केले. कार्यक्रमात अनेक प्राध्यापकांनी सहकार्य केले. डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. आर. डी. पवार, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. अर्जुन गाढे, प्रा. नंदकिशोर बोदडे, डॉ. संतोष जाधव, प्रा. प्रशांत मोरे, प्रा. मिलिंद मोरे, मिलिंद बोरघडे, प्रमोद जोहरे, प्रमोद भोईटे इत्यादींनी सहकार्य केले.

Exit mobile version