Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मनवेल येथील विवाहिता बेपत्ता; पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील विवाहिता घर सोडून निघुन गेली असुन याबाबब यावल पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी दिलेल्या खबरीवरून विवाहीत तरूणी हरविल्याची नोंद करण्यात आलेली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, शारदा सचिन बागुल राहणार मनवेल ता. यावल ही दिनांक १२ डिसेंबर रोजी आपल्या पती सचिन बागुल यांच्याशी झालेल्या कौटुंबिक वादामुळे गावातच राहणाऱ्या आजी सासु कमलाबाई वसंत बागुल यांचे कडे काही दिवस राहण्यासाठी आली असता दिनांक १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या मागे शौचालयला जावुन घरात परतली असता त्यांची नात सून शारदा घरातुन निघुन गेल्याचे दिसून आली.

या संदर्भात कमलाबाई वसंत बागुल यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेतली तेथे विवाहीतेची हरविल्याची नोंद करण्यात आली असुन, पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सिकंदर तडवी हे करीत आहे

Exit mobile version