Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या अल्पसंख्यांक तरुणांना मिळणार प्रशिक्षण

 

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र सरकारने राज्यात पोलीस भरती करण्याची घोषणा केली आहे या भरतीसाठी अल्पसंख्यांक तरुणांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस भरती २०२० अंतर्गत १२ हजार ३५० जागांची भरती केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. यात अल्पसंख्याक तरुणांसाठी राज्य सरकारतर्फे भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी https://forms.gle/Sfr1Xe3frMCkoPak8 या लिंकवर फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्यातील पोलीस भरती प्रशिक्षणासाठी इच्छुक अल्पसंख्यांक तरुणांनी डॉ.अब्दुल करीम सालार +919112030014, रागिब अहमद 9975660160 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version