Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पसंख्यांक उमेदवारानी रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी – वि.जा. मुकणे

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी व सुविधाचा लाभ घेण्यासाठी अल्पसंख्यांक उमेदवारानी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी करावी आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी केले आहे.

सन २०१३ पासून जिल्हयातील उमेदवारांची नाव नोंदणी विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर सुरु झालेली आहे. ऑनलाईन नाव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येतो.

या अनुषंगाने अल्पसंख्यांक उमेदवाराना देखील रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधी व सुविधाचा लाभ मिळणे करीता जास्तीत जास्त अल्पसंख्यांक उमेदवारानी ऑनलाईन नांव नोंदणी करणे अपेक्षीत आहे.

कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांना देखील नांव नोंदणी करण्यांबाबत मार्गदर्शन व सहाय्यक या कार्यालयाकडून करण्यात येते ‘कोविड-१९’ च्या प्रादूर्भावामुळे सध्यस्थितीत रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या कार्यालयामार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यात यावा. तसेच अल्पसंख्याक उमेदवारानी देखील आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त वि.जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते संध्या ६.१५ या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७ – २९५९७९० वर संपर्क साधवा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

Exit mobile version