Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते जैन स्वाध्याय भवनात लसीकरण केंद्राचे उद्घाटन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी  । येथील आर.सी.बाफना जैन स्वाध्याय भवन येथे आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

राज्य शासन, महापालिका, भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन, सकल जैन श्री संघ जळगावच्या माध्यमातून हे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. आहे. याप्रसंगी  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर जयश्री महाजन,   आयुक्त सतिष कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन. एस. चव्हाण, माजी खा.ईश्वरलाल जैन, माणकचंद बैध, कस्तुरचंद बाफना, जैन उद्योग समूहाचे अतुल जैन, नगरसेवक नितीन लढ्ढा, अमर जैन, रेडक्रॉसचे गनी मेमन, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी आदींनी भेट देत पाहणी केली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की,  जिल्ह्यात लस ज्या प्रमाणात उपलब्ध होईल त्याप्रमाणात जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सामाजिक संस्था यांच्या मार्फत १०० टक्के लसीकरण करण्यात येईल.  मागील काळात कोरोना संसार्गामध्ये जळगाव जिल्हा पुढे असल्याचे चित्र निर्माण झाले होता, मात्र आता सांगायला अभिमान वाटतो की जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेनुसार व जिल्हाधिकारी यांच्या चांगल्या कार्यामुळे जळगाव जिल्हा सर्वात खालच्या क्रमांकवर आला आहे. कोरोना नियंत्रणाचे राज्य सरकारचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत.  महापालिका, जैन इरिगेशन , स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरणाचा चांगला उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  दरम्यान लॉकडाऊन वाढविण्याबाबत उद्या होणाऱ्या कॅबीनेटच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

जैन उद्योग समूहाचे अतुल जैन यांनी लसीकरणाबाबत माहिती देतांना सांगितले की,  आर.सी.बाफना जैन स्वाध्याय भवन केंद्रावरील लसीकरण कसे सुरळीत होईल व लसीकरणाची संख्या कशी वाढविता येईल याचा प्रयत्न करणार आहोत.  लसीकरणासाठी वेळेचा स्लॉट दिला असल्याने नागरिक त्यांच्या वेळेवर येवून लसीकरण करून घेत आहेत.   स्वाध्याय भवनची जागा प्रशस्त असल्याने येथे गर्दी न होता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. आता १ हजार नागरिकांच्या लसीकरणाचे नियोजन असून आम्ही शासनाकडे २ हजार लसीकरण करण्याची परवानगी मागितली आहे कारण यातून कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे सुलभ होणार आहे. 

 

 

 

Exit mobile version