Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंत्री ना. अनिल पाटील यांचे उद्या होणार जंगी स्वागत

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात येणारे ना. अनिल भाईदास पाटील यांचे उद्या सकाळी जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

अमळनेरचे आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रतोद अनिल भाईदास पाटील यांची विलक्षण नाट्यमय घटनांमध्ये मंत्रीपदी वर्णी लागली असून ते उद्या म्हणजे ७ जुलै रोजी पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात येत आहेत. यानिमित्त त्यांच्या जंगी स्वागताची चाहत्यांतर्फे तयारी करण्यात आली आहे.

कॅबिनेट मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा निश्चित झाला असून.७ जुलै रोजी म्हणजेच ना. अनिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ते जिल्ह्यात येत आहेत. या दरम्यान जळगाव ते अमळनेरच्या दरम्यान त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. ते ठिक ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी यांचा भेटीगाठी करणार असून;म्हसले,टाकरखेडा, चांदणी कुहरे,याठिकाणी सत्कार स्वीकारून पुढे सती माता मंदिरावर नतमस्तक होणार आहेत.तदनंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास मंगळग्रह मंदिरावर दर्शन व आरती करून मंदिरापासून मोटरसायकल रॅली व मिरवणुकीस प्रारंभ होऊन अमळनेरात आगमन होईल.

यानंतर, पैलाड,फरशी पूल,दगडी दरवाजा मार्गे राणी लक्ष्मीबाई चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन, पुढे सुभाष चौक,नगरपालिका, होऊन पाच पावली मंदिर परिसरात सत्कार ते स्वीकारणार आहेत. आगेकूच करीत असताना बस स्थानक परिसर,रेस्ट हाऊस तसेच माजी आ. साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी सत्कार व वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारतील.मंत्री पदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच घरी परतत असलेले ना.अनिल पाटील घरी स्वागत व सत्कार सायंकाळी पाच वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांची लाडूतूला होईल.व पुन्हा निवासस्थानी परततील.व निवासस्थानी उशिरापर्यंत वाढदिवसाचा शुभेच्छा स्वीकारतील.

दरम्यान, ना. अनिल भाईदास पाटील यांचे जळगाव आणि अमळनेरात पहिल्यांदाच आगमन होणार असल्याचे अजितदादा पवार गटाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच ना. पाटील यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

Exit mobile version