Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दूध व्यावसायिकाची ५० हजारांत फसवणूक; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील चैतन्यनगरातील दूध व्यावसायिकाला कर्जप्रकरण करून देण्याचे सांगत एकाने ५० हजार रुपयांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शेखर वाल्मीक वाघ याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, चैतन्य नगरात कुणाल शांताराम मेतकर  (वय-३१) हे वास्तव्यास असून त्यांचा दूध व्यवसाय आहे. त्यांना शेखर वाल्मीक वाघ याने कर्जप्रकरण करून देतो असे सांगत मेतकर यांच्याकडुन १ लाख रुपये घेतले. ५ नोव्हेंबर २०२० ते ६ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ही घटना घडली.  कुणाल मेतकर यांनी वाघ याच्याकडे कर्ज प्रकरणाबाबत पाठपुरावा  केला. तसेच कर्ज प्रकरणासाठी दिलेले कागदपत्र व पैसे परत मागितले.  मात्र शेखर वाघ याने कागदपत्र परत दिले नाहीत. दिलेल्या पैशांपैकी केवळ ५० हजार रुपये परत केले. उर्वरित ५० हजार रुपये मागितले असता वाघ याने मी कुणाल मेतकर यांना तुझ्याकडून जे होईल ते करून घे अशी धमकी दिली.  वर्षभरानंतरही  उर्वरित ५० हजार रुपये मिळत नसल्याने अखेर मंगळवार १ फेब्रुवार रोजी कुणाल मेतकर यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून शेखर वाल्मीक वाघ यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज पवार हे करीत आहेत.

Exit mobile version