Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंत्रालयासमोर दूध फेकून आंदोलन ; राजू शेट्टी पोलिसांच्या ताब्यात

Raju Shetty

 

मुंबई (वृत्तसंस्था) मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागिदारी योजनेचा (आरसेप ) करार त्वरीत रद्द करावा या मागणीसाठी आज आंदोलन केले. आंदोलनानंतर राजू शेट्टी आणि आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, जपान व दक्षिण कोरिया यांचा समावेश असलेल्या देशांच्या गटातर्फे ‘रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप’ (आरसेप) या व्यापार विषयक करारावर आज सह्या करण्यात येणार आहेत. भारतातर्फे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होत असलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, या करारामुळे दुधासह अनेक गोष्टींवरचे आयात शुल्क कमी करावे लागणार असून त्यामुळे चीन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड या देशातील माल भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येईल. त्यामुळे आधीच मंदीच्या फेऱ्यात अडकलेला शेतकरी आणि इतर घटक जास्तीचे अडचणीत येतील. त्यामुळे सध्याच्या स्थितीत या करारावर भारताने स्वाक्षरी करू नये, अशी जनता दल तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

Exit mobile version