Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निमखेड बुद्रुक येथे अग्निवीर जवानांची जंगी मिरवणूक !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय लष्करात अग्नीवीर म्हणून मुक्ताईनगर तालुक्यातील दोन आणि मलकापूर तालुक्यातील तीन अशा ५ जवानांची निवड झाल्याने त्यांचा जंगी स्वागत सोहळा व मिरवणूक निमखेडी बुद्रुक येथे घेण्यात आले आहे.

नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या निवड चाचणी व परीक्षेमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील पुरुषोत्तम महादेव तायडे, सुकळी येथील शुभम सुनील डापके आणि मलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा येथील वैभव मोरे, वैभव शिमरे, राहुल बिलावर अशा पाच जवानांनी यश मिळवले आहे. तायडे व डापके या दोघांनी मुक्ताईनगर तालुक्यातील पहिले अग्नीवीर होण्याचा बहुमान देखील मिळवलेला आहे. या निमित्ताने निमखेडी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात जंगी सोहळा आयोजित करत संपूर्ण गावातून पाचही जवानांची मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी “विविध देशभक्तीपर गीतांच्या तसेच वंदे मातरम आणि भारत माता की जय” घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी महादेव भिवसन तायडे, मनेश खवले, वासुदेव न्हावकर, आर्यन वाडेकर, अंबादास पाटील, राहुल धाडे, महादेव वरखडे, वैभव तायडे, अजय खांजोळे, नितीन भोंगरे, राहुल भोंगरे, राहुल तायडे, योगेश खांजोळे, जितेंद्र सोनोवने, पवन भोंगरे, शुभम वराडे, जितेंद्र भंगाळे, चेतन टाकरखेडे, अभिषेक कांडेलकर यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version