Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा परीक्षेत मिलिंद निकमला सुतारकाम स्किलमध्ये गोल्ड मेडल

जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील विद्यार्थी मिलिंद निकम याने सुतार काम स्किलमध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने राज्यस्तरावर निवड होवून गोल्ड मेडल मिळविले आहे. आज ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या औचित्याने मुंबई येथील कार्यक्रमात गौरविण्यात आले.

राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा परीक्षा ३ सप्टेंबर रोजी घेण्यात आल्यात. यात जळगाव शासकीय आयटीआय मशिनिस्ट ट्रेडचा मिलींद निकम यांनी सुतारकाम या कौशल्य स्किलमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक मिळाले असून गोल्ड मेडलचे मानकरी ठरले आहे. 

आज रविवार ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने मुंबई येथे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री नवाब मालिक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयचे संचालक दिगंबर दळवी यांच्याहस्ते मिलिंद निकम यांना गोल्ड मेडल, ट्रॉफी रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला.

नॅशनल स्तरावरील बेंगलोर येथे होणाऱ्या कौशल्य स्पर्धा परीक्षांमध्ये त्याची निवड झालेली असून आयटीआय जळगाव या संस्थेचे नाव वर नेले आहे.  मिलिंद निकम हा जळगाव चा रहिवासी असून त्याने बी.ए.  शिक्षण झाल्यानंतर आयटीआय मशिनिस्टला प्रवेश घेतला होता.

Exit mobile version