Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेसाठी मिलींद निकम यांची निवड

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, नवी मुंबईतर्फे आयोजित करण्यात आलेल्या “आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धा २०२१” स्पर्धेकरिता पहिल्या टप्प्यासाठी जळगाव जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून मिलींद निकम यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यामधून शुभेच्छा देण्यात येत आहे.

सदर स्पर्धा २३ व २४ ऑगस्ट २०२१ रोजी अनिल माथूर सी-६३, एमआयडीसी, मेन रोड टीटीसी इन्स्टिट्यूट एरिया तुर्भे, एमआयडीसी, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे. जागतिक पातळीवरील कैशल्य स्पर्धा 2021 (प्रथम लेव्हल)  जिल्हास्तरीय कैशल्य स्पर्धा दिनांक 18/8/2021 झाली. त्या कैशल्य स्पर्धेत उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रशिक्षणार्थी मिलींद निकम यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच पुढील स्पर्धेसाठी संस्थेचे प्राचार्य ए.आर.पाटील, उपप्राचार्य आर. पी. पगारे, कार्यालय अधिक्षक बी. के कुमावर तसेच व्यवसाय शिल्प निदेशक डी.एस. सैदाणे आणि सत्काराथी प्रशिक्षणाथी मिलींद निकम यांना पुष्पगुच्छा देवून शुभेच्छा देण्यात आल्या.

Exit mobile version