Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंढेगाव येथे एका विहीरीत मायलेकीचे मृतदेह आढळले

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळा परिसरातील विहिरीत २३ वर्षाची विवाहिता आणि तिच्या तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. प्रियंका दराणे आणि वेदश्री दराणे असे या माय-लेकीचे नाव आहे. दोघीही जवळच असणाऱ्या शेणवड खुर्द येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे. जिंदाल कंपनीजवळ शासकीय आश्रमशाळा आहे.

आश्रमशाळा परिसरात असलेल्या विहिरीला कठडा नाही. बालिका विहिरीत पडल्याने तिला वाचविण्यासाठी आईने उडी मारली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धामच्या मोफत रुग्णवाहिकेने घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य केले.

Exit mobile version