Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी अपघातात मायलेकी जखमी; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खोटेनगर जवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने मागे बसलेली महिला व तिची मुलगी असे दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी १६ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बुधवारी १७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता दुचाकीधारकावर जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, रूबीना हारूण पटेल रा. पाळधी ता.धरणगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी १६ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता रूबीना पटेल या महिला आपल्या मुलगी तमन्ना असे दोनजण शागीर सुलतान चव्हाण रा. पाटीलवाडा भुसावळ याच्या दुचाकी (एमएच १९ ईएफ ८२८४) वर बसून पाळधी येथे जात असतांना खोटेनगर येथे दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी थेट रस्त्यावरील झाडावर आदळली. यात रूबीना व तिची मुलगी तमन्ना हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी बुधवारी १७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता दुचाकी चालविणारा शागीर सुलतान चव्हाण याच्यावर जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव हे करीत आहे.

Exit mobile version