Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोटारसायकल अट्टल चोर एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील आर.एल. चौकात चोरीच्या दुचाकीसह संशयित आरोपीस एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. दुचाकी मलकापूर येथून चोरी केली असल्याची कबुली दिल्याने पुढील कारवाईसाठी मलकापूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल किशोर पाटील, सुधीर साळवे हे पेट्रोलिंग करत असताना. आर.एल.चौफुलीवर एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले. त्यांची अधिक चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्याची कसून चौकशी केली असता दिगंबर भगवान वानखेडे रा.वाघुळ ता. मलकापुर असे सांगितले. त्याच्या सोबत असलेली दुचाकी ही चोरीची असल्याचे सांगून आपल्या सोबत असलेले साथीदार सौरभ मुरलीधर राऊत आणि गौरव एकनाथ दांडगे सर्व रा. वाघुळ ता. मलकापुर असे असल्याचे सांगितले. तिघांनी मिळून ही दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी दुचाकीसह संशयित आरोपी बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version