राज्यात लवकरच मध्यावधी निवडणूक : रोहित पवार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकार कोसळून राज्यात लवकरच मध्यावधी निवडणूक होणार असल्याचा दावा केला आहे.

राज्यात शिंदे सरकार सत्तारूढ झाले असले तरी अजून न्यायालयीन लढाई बाकी आहे. यातच मंत्रीमंडख रखडल्यानेही चर्चेला उधाण आलेले आहेत. येत्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी अपेक्षा आहे. या पार्श्‍वभूमिवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेले विधान चर्चेचा विषय ठरले आहे.

जुन्नर येथील कार्यक्रमात रोहित पवार म्हणाले की, सध्याची परिस्थिती पाहता पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि त्यानंतर लगेचच येत्या ३ महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्यानंतर लगेचच आमदारकीच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. तसेच आता राजकारणातील सत्तेची सूत्रे ही तरूणांच्या हाती येणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

Protected Content