Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सर्व धर्मीय वेशभूषा परिधान करत विद्यार्थ्यांचा एकात्मतेचा संदेश

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आषाढी एकादशीनिमित्त जामनेर शहरांमधील विविध शाळेंनी शहरात दिंडी काढत सर्व धर्मीय वेशभूषा परिधान करून जातीय सलोखा दाखवण्याचं काम केलं. यावेळी आमदार गिरीश महाजन व साधना महाजन यांनी दिंडीमध्ये सामील होऊन पालखीचे पूजन केले.

यावेळी नगरपालिका गटन येथे डॉ. प्रशांत मुंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील, जि प सदस्य विलास पाटील, उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, अभय बोहरा, हेमंत वाणी, पिंटू कोठारी, नगरसेवक झाल्टे बाबुराव हिवाळे, सुहास पाटील, उल्हास पाटील आदी. दिंडीमध्ये सहभागी झाले होते.               

जामनेर शहरातील लॉर्ड गणेशा स्कूल, बोहरा स्कूल, लिटल फ्लॉवर स्कूल, ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषा मध्ये दिंडी काढली. यावेळी विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेष पारीधान करत सजीव आरास चिमुकल्यांनी केली होती.

त्याचबरोबर सर्व धर्मीय वेशभूषा परिधान करून जातीय सलोखा दाखवण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलं. दिंडीमध्ये सर्व विद्यार्थी चिमुकले नाचत गात  विठू नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात रंगून गेले होते.

Exit mobile version