Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पॅसेंजर ऐवजी धावणार मेमू गाड्या; जीएम यांची माहिती

भुसावळ प्रतिनिधी । मध्य रेल्वेत धावणार्‍या पॅसेंजर ऐवजी मेमू गाड्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक (जीएम) डी.के. शर्मा यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शर्मा हे बुधवारी भुसावळ विभागाच्या दौर्‍यावर होते. ठिकठिकाणी निरीक्षण केल्यानंतर त्यांनी भुसावळातील डीआरएम कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी शर्मा म्हणाले की, मध्य रेल्वेच्या पाचही विभागात धावणार्‍या पॅसेंजर लवकरच बंद होऊन त्याऐवजी मेमू गाडी धावणार आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. ज्या विभागात विद्युतीकरण झाले आहे, तेथे प्राधान्याने मेमू चालवण्यात येईल असे त्यांनी सांगितले. मेमू रेल्वे गाड्यांमध्ये वरील बर्थ नसून फक्त आसनव्यवस्था दिलेली असते.

दरम्यान, डी.के. शर्मा यांच्याहस्ते भुसावळ येथील झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये नुकत्याच बांधण्यात आलेल्या नवीन वसतिगृह उद्घाटन करण्यात आले. यानंतर त्यांनी विविध विभागांची पाहणी केली.

Exit mobile version