Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘एक झाड वैष्णवीच्या आठवणीच’ , श्रध्दांजली सभेतून व्यक्त झाल्या शोक भावना

जळगाव प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी वैष्णवी लोखंडे हिने राहत्या घरी आत्महत्या केली. दरम्यान, महाविद्यालयात आज तिला श्रध्दांजली सभेतून शोक भावना व्यक्‍त करण्यात आल्यात व परिसरात तिची आठवण राहावी म्हणून वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, अधिष्टाता एन एस आर्विकर,स्त्रीरोग तज्ञ माया आर्विकर, डॉ. सी. डी. सारंग, डॉ विठठल शिंदे, डॉ. बापूराव थिटे, डॉ विजय मोरे, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड इ मान्यवर उपस्थीत होते. यावेळी वैष्णवी ही सर्व मित्र मैत्रीणीची लाडकी होती तिच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्‍का बसला. तिच्या आठवणीसाठी एक वृक्ष लावून संगोपन करण्यात येणार असल्याचे डॉ. बापुराव थिटे यांनी मनोगतातून सांगितले तर विक्रम गायकवाड हया विदयार्थ्यांने आमची लाडकी मैत्रीण या जगात नाही हयावर विश्‍वासच बसत नाही. वैष्णवीच्या आठवण कायम आमच्या सोबत राहणार असून आम्ही वैष्णवी झाड लावण्याची व संगोपनाची जबाबदारी घेउन आठवणी जोपासू असे सांगीतले. यावेळी मान्यवराचे हस्ते वैष्णवीच्या आठवणीच झाड लावण्यात आले. शेवटी अधिष्टाता डॉ. एन एस आर्विकर यांनी शांती मंत्र म्हणून शोकसभेची सांगता केली.

 

 

 

 

Exit mobile version