विद्यापीठ आणि हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट यांच्यात बुधवार दि. २२ जून रोजी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्टचे जागतिक मुख्यालय हैदराबाद येथे असून १६० देशांमध्ये त्याचा विस्तार आहे. मानसिक आरोग्यासाठी ध्यान विनामुल्य सर्वांपर्यंत पोहचविणे हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे. या सामंजस्य कराराद्वारे विद्यार्थ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी मानसिक, अध्यात्मिक आरोग्य कार्यशाळा घेतल्या जातील. मानसिक शांतता, ध्यानधारणा, नैतिक मूल्यशिक्षण यासाठीचे विविध कार्यक्रम घेतले जातील. पदवी व पद्व्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ओळख वर्ग घेतली जाणार आहे. याचा निश्चितच विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा यावेळी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी व्यक्त केली. या सामंजस्य करारावर प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार यांनी तर हार्टफुलनेसच्या वतीने विभागीय समन्वयक डॉ. विकास देव यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, अनुसया रामचंद्र, इंजि. आर.आय. पाटील, डॉ. निलम अग्रवाल, मिनाक्षी पाटील, सुनिता पाटील, गिरीश मुंदडा, कर्नल उत्तम पाटील, अपुर्वा अग्रवाल आदी उपस्थित होते.

 

Protected Content