Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील सेवेबद्दल मेहर यांनी व्यक्‍त केले समाधान

जळगाव प्रतिनिधी । सन २०२१-२०२२ या वर्षासाठी रोटरी जळगाव ड्रिस्ट्रीक्टचे गर्व्हनर असलेल्या रोटेरीयीन रमेश मेहर यांनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली. या भेटीत रुग्णालयातील आयसीयू, मदर मिल्क बँक तसेच विविध विभागाची पाहणी करुन रुग्णांना देण्यात येणार्‍या सेवा-सुविधांबद्दल मेहर यांनी समाधान व्यक्‍त केले.

रोटरीचे ड्रिस्ट्रीक्ट गर्व्हनर रमेश मेहेर हे बुधवार, १८ ऑगस्ट रोजी ऑफिशियल क्‍लबच्या भेटीसाठी आले होते. याप्रसंगी त्यांनी गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली. सर्वप्रथम डिस्ट्रीक्ट गर्व्हनर रमेश मेहेर यांनी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील आयसीयू, नव्याने स्थापन झालेली मदर मिल्क बँक, ब्लड बँक तसेच अन्य विभागांना भेटी दिल्यात, याप्रसंगी रुग्णालयातून दिल्या जाणार्‍या सेवेबद्दल मेहेर यांनी समाधान व्यक्‍त केले. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डिस्ट्रीक्ट गर्व्हनर रमेेश मेहेर यांच्यासमवेत रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्टच्या टिमचे स्वागत गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सदस्य डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील  यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन  केले. 

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाचे सदैव सहकार्य – डॉ.उल्हास पाटील

यावेळी रोटरी डिस्ट्रीक्ट गर्व्हनर रमेेश मेहेर यांनी रोटरीच्या आगामी काळातील आरोग्यविषयक उपक्रमांबाबत माहिती दिली, त्यात रक्‍तदान शिबिर, डायलेसिस सेंटर, ह्दयशस्त्रक्रिया, मदर मिल्क बँकेसंदर्भात जनजागृती, विविध आरोग्य शिबिरे आयोजन यांचा समावेश होता आणि या सर्वांना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षाही मेहेर यांनी व्यक्‍त केली. यानंतर डॉ.उल्हास पाटील यांनी रोटरीच्या सर्वच उपक्रमांना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाचे सदैव सहकार्य राहील असे सांगितले.

यांची होती उपस्थिती 

कार्यक्रमाप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या तथा रोटेरीयन डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील यांच्यासह रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष क्रिष्णा कुमार वाणी, सचिव अनुप असावा, असीस्टंट गर्व्हनर डॉ.गोविंद मंत्री, असि.गर्व्ह.संगिता पाटील, सुनिल सुखवाणी, गनी मेमन, नितीन रेदासनी, विनोद बियाणी, संदिप काबरा, योगेश भोळे, तुषार चित्‍ते, सुरज जहांगिर, सदस्य संदिप भोळे, गौरव सपकाळे, विजय शमवानी, डॉ.सुशिल राणे, तुषार चित्‍ते आदि उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे शिवानंद बिरादर, मेट्रन संकेत पाटील आदिंचे सहकार्य लाभले.

डिस्ट्रीक्ट गर्व्हनर रमेश मेहेर यांच्या हस्ते नर्सिंग स्टाफचा सत्कार 

कोविड काळातील सेवा तसेच रुग्णालयात नियमितपणे सेवा देणार्‍या नर्सिंग स्टाफचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रातिनिधीक स्वरुपात हा सत्कार करण्यात आला असून यात नर्सिंग स्टाफ इंचार्ज अर्चना महाजन, मनिषा नाईक, धनश्री चौधरी, गिरीश खडसे यांचा डिस्ट्रीक्ट गर्व्हनर रमेश मेहेर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Exit mobile version