Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आग

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जिल्ह्यातील मेहेकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाला आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याली घटना समोर आली आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सकाळी पहाटे 5 वाजेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाला आग लागल्याचे कोतवाल यास दिसून आले, त्यांनी तात्काळ एसडीओ यांना माहिती दिली व नगरपालिकेला कळविण्यात आले. दरम्यान अग्निशमन वाहन येई पर्यंत उपनिबंधक विभाग, आपत्ती व्यवस्थानपन विभाग व निवडणूक विभागातील सर्व फाईल्स व कागदपत्रे जळून गेली आहेत. तसेच याच इमारती मध्ये असंख्य विभाग असल्याने नगरपालिकेचे अग्निशमन येई पर्यंत कार्यलयातील सर्व विभाग जळून खाक झाले होते.

उपविभागीय कार्यलय शहरातील मध्यभागी असून एक जुनी इमारत आहे. या कार्यलयाच्या आजूबाजूला मोठी मानवी वस्ती आहे. मात्र वेळीच आग विझविल्या गेल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले, अन्यथा आग परिसरात पसरली असती व मोठी घटना घडली असती. मात्र या आगीत मात्र शासकीय कार्यलयाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.

 

Exit mobile version