Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या काही पॅसेंजर्स रद्द

भुसावळ प्रतिनिधी । रविवार दिनांक १६ रोजी शेगाव येथे मेगाब्लॉक घेण्यात येणार असून यामुळे काही पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

याबाबत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बडनेरा विभागातील शेगाव रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाच्या गर्डरचे काम करण्यासाठी रविवार दिनांक १६ जून रोजी चार तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याकरिता काही पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात येणार आहे. यात गाड़ी क्रमांक ५११८३- भुसावल नरखेड पॅसेंजर; गाड़ी क्रमांक ५११८४ नरखेड भुसावल पॅसेंजर, गाड़ी क्रमांक ५११५१-नवी अमरावती ते नरखेड पॅसेंजर; गाड़ी क्रमांक ५११५२ नरखेड ते नवी अमरवती पॅसेंजर या गाड्यांचा समावेश आहे. याची प्रवाशांनी दखल घेण्याचे आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे.

Exit mobile version