Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल तहसील कार्यालयात मतदान नोंदणी संदर्भात बैठक

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल तहसील कार्यालयात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासंदर्भात नवीन मतदार जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

मतदारांमध्ये जनजागृती नवीन मतदार नोंदणी, दुबार मतदारांचे नाव वगळणे तसेच गरुड ॲप्लीकेश व मतदार हेल्पॲप्लीकेशनच्या माहिती संदर्भात १७ सप्टेंबर २०२१ रोजी विविध शासकीय निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख , डीडीएसपी कॉलेज एरंडोल यांचे निवडणुक साक्षरता मंडळाचे अध्यक्ष , एरंडोल तालुक्याचे सर्व 137 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बीएलओ ) व 23 सप्टेंबर 2021 रोजी एरंडोल तालुक्यातील सर्व पत्रकार यांचे समवेत बैठक आयोजीत करण्यात आली होती.

यावेळी कार्याक्रमाचे अध्यक्षपदी तहसीलदार सुचिता चव्हाण हे होते.  एरंडोल विधानसभा मतदार संघातील व एरंडोल तालुक्यातील तमाम जनतेला तहसिलदार सुचिता चव्हाण यांचे तर्फे एका मतदाराचं नांव एकाच विधानसभा मतदार संघातील एकाच मतदार यादीमध्ये समाविष्ट असावे. अन्य विधानसभा मतदार संघात नांव नोंदविलेल्या मतदारांनी इतर मतदार संघात असलेले त्यांचे नांव तात्काळ कमी करुन घ्यावे असे अवाहन केले आहे.  30 सप्टेंबर 2021 पावेतो – नव मतदार ज्यानी वयाचे 18 वर्षे पूर्ण केलेली असतील त्यांनी तात्काळ नांव नोंदणी करावी . यासाठी शासनाच्या https://www.nvsp.in/ या वेबसाईट वर online मतदार नोंदणी तसेच दुरुस्त्या देखील करता येणार आहेत . तसेच , Voter Help Line Application जास्तीत जास्त नागरीकांनी डाऊनलोड करुन त्यात आपला सहभाग नोंदवावा व 1/1 /2022 पर्यंत ज्यांचे वय 18 वर्षे कंप्लेट होईल अशा व्यक्तीने ही फॉर्म भरणे गरजेचे असल्याचे तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी आवाहन केले आहे.

 

Exit mobile version