कोरपावली येथे एकात्मतेसाठी शांतता समितीची बैठक  

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. यावेळी यावलचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधिक्षक आतिश कांबळे यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना गावपातळीवर जातीय सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले.

एखाद्या व्यक्तीने इतर समाजाची भावना दुखावल्या जातील. अशी पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल केली व दोन समाजामध्ये जातीयतेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तींवर कायदेशीररित्या कार्यवाही करण्यात येईल. असे उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले.

यावेळी गावातील एका तरूणाने गावातील काही ग्रुपवर व अनेक वेगवेगळ्या ग्रुप आणि फेसबुकवर जातीयतेढ निर्माण होईल व दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावल्या जातील अशी पोस्ट व्हायरल करून आणि चेतावणी देउन पोस्ट केली म्हणून त्या अनुषंगाने गावातील कायदा सुव्यवस्था कायम रहावी. या दृष्टीकोणातून सपोअ आशित कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरपावली येथे तात्काळ शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी कोरपावली गावाचे प्रथम नागरीक सरपंच विलास नारायण अडकमोल, माजी सरपंच जलील पटेल, प्रगतशील शेतकरी पिरण पटेल, समाजसेवक मुक्तार पटेल, पोलीस पाटील सलीम तडवी, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, माजी उपसरपंच इस्माईल तडवी, अब्दुल तडवी, ग्राम पंचायत समितीचे सदस्य आरिफ तडवी, सत्तार तडवी, समाजसेवक नारायण अडकमोल, रोहित अडकमोल, जावेद पटेल, अकिल पटेल, नौशाद पटेल, आरिफ तडवी, गफ्फार मेंबर, महेलखेडी येथील शिवशेना उपसरपंच पराग महाजन, शांताराम महाजन, हेमंत फेगडे, हर्षल महाले,  राहुल नाफडे, हमीद तडवी, रिजवान पटेल, अन्सार पटेल, रईस पटेल, नईम पटेल सह गावकरी मंडळी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content