Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात शिवजयंती निमित्त पोलीस प्रशासनाची बैठक

जळगाव प्रतिनिधी । आगामी शिवजयंतीच्या निमित्त सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीला शिव जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तथा नगरसेवक मुकेश गंजाळ, मराठा समाजाचे अध्यक्ष किरण पाटील, स्वराज्य सेना मंडळाचे पदाधिकारी प्रशांत बागले, किरण पाटील, पंकज हिंगणे, हितेश टकले, योगेश जाधव, कृष्णा शिंदे, रूपेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सहायक अधीक्षक चांडक यांनी सांगितले की, आपण दरवर्षी शिवरायांची मिरवणूक मोठ्या उत्साहात करत आलो आहे. मात्र यंदा शिवजयंती साधेपणाने साजरी करायची आहे. कोरोनामुळे यंदा नियमांचे पालन करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या समस्या मांडल्यात. नियमांचे पालन करणार्‍यांना पोलिस प्रशासनाचे सर्व सहकार्य मिळेल, असे आश्‍वासन सहायक अधीक्षक चांडक यांनी दिले. या बैठकीला पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह सहकारी उपस्थित होते. नियमांचे पालन करणार्‍यांना पोलिस प्रशासनाचे सर्व सहकार्य मिळेल, असे आश्‍वासन सहायक अधीक्षक चांडक यांनी दिले.

 

Exit mobile version