Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात रक्तदान शिबीराच्या नियोजानासाठी अधिकाऱ्यांची बैठक

रावेर प्रतिनिधी । कोरोना काळात जनहितासाठी रक्तदान शिबीराच्या आयोजनासाठी तालुकास्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची न्यायालयाच्या आवारात न्या. आर.एल. राठोड यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

 

आयोजित बैठकीत आठ ते दहा ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करण्यासाठी निधी जमा करण्यावर चर्चा झाली. रावेर न्यायालय परिसरात न्या. आर. एल. राठोड, तहसीलदार उषाराणी देवगुणे, गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल,  वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.डी. महाजन, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, वकील संघातर्फे ॲड. योगेश गजरे, ॲड. जे.जी.पाटील, ॲड. डी.ई.पाटील, अँड महाजन आदी उपस्थित होते.

 

या विषयावर झाली चर्चा

दरम्यान सरकारी सर्व नोकरवर्ग, वकील संघ, पोलीस प्रशासन पंचायत समिती सर्व कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी असे मिळून रक्तदान शिबिराचे आयोजित करण्याचे ठरले आहे. वर्गणी करून ऑक्सिजन सिलेंडर जास्तीत जास्त कसे उपलब्ध करून देणे संसर्गजन्य आजार वाढू नये. करिता प्रत्येक नागरिकांनी मास्कचा वापर केलाच पाहिजे,तसेच सोशल डिस्टन्सचे पालन सर्वांनी केले पाहिजे ,विनाकारण घरातून बाहेर पडू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version