Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कारखाना विक्रीच्या विरोधात २९ जून रोजी सभासद व कामगारांची बैठक

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विक्रीस काढण्यास येणार असल्याने त्याची विक्री न करता तो भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा. या मागणीसाठी मधुकर सहकारी साखर कारखाना साइटवर कारखाना सभासदांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यात साखर उत्पादन क्षमतेत क्रमांक एकवर असलेला आणि आता आर्थिक संकटात असलेल्या तालुक्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विक्रीस काढण्यास येणार असल्याने कारखान्याची विक्री न करता तो भाडेतत्त्वावर चालविण्यास द्यावा. या मागणीसाठी मधुकर सहकारी साखर कारखाना साइटवर २९ जून रोजी सकाळी अकरा वाजेला कारखाना सभासदांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

कर्जाच्या थकबाकी पोटी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताब्यात असलेला यावल तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री केला जाणार असल्याचे वृत्त येत असल्याने कारखान्याच्या सर्व सभासदांमध्ये कमालीची अवस्थता व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखाना ताब्यात घेण्यापूर्वी कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात येणार असल्याचे, जिल्हा सहकारी बँकेकडून सभासदांना आश्वासित केले होते; मात्र सध्या बँक भाडेतत्वावर देणेऐवजी विक्री काढणार असल्याचे वृत्त असल्याने कारखान्याचे माजी कामगार प्रतिनिधी गिरीश भास्कर कोळंबे व कारखाना सभासद विजय प्रेमचंद पाटील यांनी दिनांक २९ जून रोजी कारखाना साइटवर सभासदांची बैठक आयोजित केली आहे.

शेतकरी बांधव आणि कामगार यांच्या हिताच्या दृष्टीकोणातून योग्य मार्ग काढण्यासाठी या महत्वाच्या बैठकीस सर्व सभासदांनी व कामगारांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version