Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीत जीएसटी कौन्सिलची बैठक

sitaraman

नवी दिल्ली वृत्तसंस्था । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी जीएसटी कौन्सिलची ३८वी बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

मागील काही महिन्यांपासून मंदीच्या प्रभावाने कर संकलन मोठ्या प्रमाणात आटले आहे. दरमहा किमान एक लाख १० हजार कोटींचा कर महसूल मिळावा, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र त्याला अद्याप म्हणावं तसं यश आलेले नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत जीएसटी दर आणि कर स्तराचा फेर आढावा घेतला जाईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. जीएसटी कर वाढल्यास चहा, फ्रोजन व्हेजिटेबल, औषधे, कपडे या वस्तू महाग होऊ शकतात. तसेच या बैठकीत ५ टक्क्याचा कर वाढवून तो ६ ते ८ टक्के केला जाईल किंवा काही वस्तूंवर ५ टक्क्यांऐवजी १२ टक्के कर आकारला जाईल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. जीएसटीचा कर महसूल वाढवण्यासाठी ‘जीएसटी’ कौन्सिलकडून काही वस्तूंवरील जीएसटी दरात वाढ करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Exit mobile version