Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदुर्णी पोलीस दुरक्षेत्रात दुर्गोत्सव मंडळ अध्यक्षांची सभा उत्साहात

शेंदुर्णी ता. जामनेर (प्रतिनिधी ) । पोलिस दुरक्षेत्रात पहुर पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांचे अध्यक्षतेखाली आज ६ ऑक्टोबर शेंदूर्णी शहरातील दुर्गोत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते डी. जे. चालक व काही सन्माननीय नागरिक यांची सकाळी ११ ते १२ वाजेचे दरम्यान मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.

मिटिंगमध्ये आगामी नवरात्र, रावण दहन, दसरा उत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांनी निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सूचना समजावून सांगण्यात आले. नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे बाबत सूचित करण्यात आले. नवदुर्गा स्थापना व विसर्जन बाबत कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही. याबाबत दुर्गोत्सव मंडळ अध्यक्षांना सक्त सुचना देण्यात आल्या आहेत. तरी शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करून उत्सव सण साजरे करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी केले आहे.

Exit mobile version