Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त उद्या धरणगाव तालुका शिवसेनेची बैठक

0Aaditya Thackeray 11

धरणगाव (प्रतिनिधी) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धरणगावात तालुका शिवसेनेची तातडीची बैठक उद्या (दि.१६) रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ हे मार्गदर्शन करणार आहेत.

 

या बैठकीसाठी तालुक्यातील सर्व नगरसेवक, जि. प.सदस्य, प.स.सदस्य, शिवसेना व युवासेना / विविध संघटनेचे पदाधिकारी शिवसैनिक यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ही बैठक नवीन प्रशासकीय इमारत नगरपालिकेत सकाळी १० वाजेला आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ हे मार्गदर्शन करणार आहेत. तर तालुका संपर्क प्रमुख महेश खैरनार, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, तालुका प्रमुख गजानन नाना पाटील, नगराध्यक्ष सलीम भाई पटेल, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील, गोपाल बापू चौधरी, सभापती अनिल पाटील, आसाराम भाऊ पाटील, प्रेमराज पाटील, मुकुंद नंनवरे,लोकनियुक्त सरपंच मा.सभापती सचिन पवार हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व सम्मानिय नगरसेवक , शहर प्रमुख विभाग प्रमुख , शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख महिला आघाडी , सर्व शिवसैनिक युवासैनिकांनी उपस्थित रहावे, अशी सूचना युवासेना तालुका प्रमुख चेतन पाटील, पवन पाटील, अजय पाटील, अमोल पाटील, संतोष महाजन, विशाल माळी, पप्पू ठाकरे यांनी केली आहे.

Exit mobile version