Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधान किसान मानधन योजनेबाबत शुक्रवारी धरणगावात बैठक

pantpradhan kisan yojana

धरणगाव, प्रतिनिधी | केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान मानधन योजनेच्या कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शक सूचनांची माहिती देणारे एक पत्र आज (दि.२०) तेथील तहसीलदारांना ई-मेलने परप्र झाले आहे. सदर योजनेबाबत दि.२३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता येथील तहसिल कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

त्या पत्रानुसार, ही योजना ९ ऑगस्टपासून संपूर्ण देशात लागू झाली आहे. त्यासाठी लाभार्थी हे १८ ते ४० वयोगटातील व दोन हेक्टरपर्यंत शेती असलेले अल्पभूधारक व सीमांत शेतकरी असतील. पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा ३००० हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. तसेच लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूदही या योजनेत आहे. या योजनेच्या लाभार्थी नोंदणी प्रक्रीयेमध्ये गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी,सहाय्यक निबंधक, सर्व (सेतु सुविधा केंद्र), तलाठी, ग्रामसेवक, कृषिसहाय्यक, गटसचिव या सर्व घटकांचा सामावेश करण्यात आलेला आहे. सदर योजनेबाबत दि.२३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता येथील तहसिल कार्यालयात संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यावेळी योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

Exit mobile version