Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आदिवासी दिन नियोजनार्थ चोपड्यात बैठक उत्साहात

e703c6af 4a2c 40c6 b423 fe3c2cfae1d6

 

चोपडा (प्रतिनिधी) संपूर्ण विश्वभरात दिनांक 9 ऑगष्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. चोपडा तालुक्यातही मागील काही वर्षापासून समस्त आदिवासी बांधव पारंपारिक पद्धतीने हा सण साजरा करतात. यंदाही आदिवासी दिवस मोठ्या जल्लोशात साजरा करण्यात येणार असून त्यासंदर्भात माजी आ.जगदीशभाऊ वळवी यांच्या अध्यक्षतेखाली व रचनाताई जगदीश वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठक झाली.

आदिवासी दिन नियोजनार्थ झालेल्या या बैठकीस तालूका भरातून आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात हजर होते. बैठकीचे प्रास्ताविक वळवी सर यांनी केले. यावेळी आदिवासी सेवक रमेशबापू ठाकुर,जीवन गुरुजी,प्रकाश बारेला,ताराचंद बारेला,आदिंनी मनोगत व्यक्त करीत समाज बांधवांना संबोधित केले.

 

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना माजी आ. जगदीशभाऊ वळवी म्हणाले की, आदिवासी बांधव हा देशाचा कणा आहे. आदिवासी वगळून भारत देशाची महता सांगता येणार नाही. पारंपारिक संस्कृती, प्रेम,सदभाव, आपुलकी,प्रामाणिकता,देश प्रेम,ही आम्हा आदिवासी बांधवांची खरी ओळख आहे. विखुरलेले असलो तरी आम्ही एक आहोत, याची जाणीव आहे. येणाऱ्या 9 ऑगष्ट रोजी तालूका भरातील सर्व आदिवासी बंधूनी सकाळी 10 वाजता आदिवासी दिनानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रे (रैली)साठी आपापल्या पारंपरिक वेशभुशेत यावे, असे आवाहन केले.

 

याप्रसंगी आदिवासी बांधवांनी एक मताने काही ठराव पास केले. तर आदिवासी दिनाची सुरुवात चोपडा शहरातील शासकीय विश्रामगृहा पासून होऊन सांगता माजी आ.जगदीशभाऊ वळवी यांच्या निवासस्थाना जवळ करण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. बैठकीसाठी रमेशबापू,जीवन गुरुजी,प्रकाश बारेला,ताराचंद बारेला,सिताराम पारधी,मंगल ठाकरे,हरीष पवार,भिकन दादा,पाडवी सर,गोपाल महाराज,नादान वळवी,दगड़ूभाऊ,उदेसिंग भील,आरिफ तडवी,होमा वसावे,दारासिंग पावरा,संजय पाडवी,मिथुन पावरा,राजेश बारेला,नाम सिंग पावरा,भीमराव दादा, कंचन राणे, आशाबाई सीताराम पारधी,अनिताबाई,वसंत पारधी, अक्काबाई मोहन पारधी, शोभाबाई राजाराम पारधी, ताईबाई मोतीलाल पारधी, आकाशबाई योगेश पारधी यांच्यासह तरूण आदिवासी बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.

Exit mobile version