Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किनगाव येथे सकल मराठा समाजातर्फे बैठक

यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | किनगावसह परीसरातील सकल मराठा समाजातर्फे नुकतेच बैठकीचे आयोजन किनगाव येथे करण्यात आले होते.

बैठकीच्या सुरूवातीला देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेले जवानांनसह मराठा आरक्षणाचे दिवंगत नेते विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व छत्रपती शिवरायांचे पुजन करून कार्येक्रमाला सुरूवात झाली. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मराठा सेवासंघाचे यावल तालुका अध्यक्ष अजय पाटील होते.

यावेळी उपस्थित समाज बांधवांनी आपापली मते मांडली त्यात आरोग्य, व्यावसायिक, शैक्षणीक, वैवाहीक इ.सह तरूणांना व्यवसायाबाबत मार्गदर्शन मिळावे. यासाठी समाज बांधवांनी एकमेकांना सहकार्य करावे. तसेच समाजाचे मंगल कार्यालय व्हावे, यासारख्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तर समाजहीतासाठी व तरूणांना नोकरी व्यवसायासंदर्भात कार्येक्रमाचे अध्यक्ष अजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी किनगाव सह परिसरातील सकल मराठा समाजातील तरुण व ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती.

Exit mobile version