Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

स्वातंत्र्य चौकातील औषधाच्या दुकानात चोरी

chori 1

जळगाव प्रतिनिधी । स्वातंत्र्य चौकातील बंद शिवम मेडीकलचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी काऊंटरमधील 25 हजाराची रोकड लांबविल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर स्वातंत्र्य चौकात टेलीफोन नगरातील प्लॉट नं 9, दत्त मंदिराजवळ मुक्ताई धनाई बिल्डींगमध्ये नितीन भरत पाटील हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचे स्वातंत्र्य चौकातील मोहिते ब्लिडींगमध्ये दुकान नं 3 प्लॉट नं 399 येथे शिवम नावाचे मेडीकल आहे. त्यावर ते उदरनिर्वाह भागवितात. सकाळी 9 वाजेच्या सुमारास मेडीकल उघून रात्री 9.30 वाजता बंद करतात. 20 रोजी रात्री नेहमीप्रमाणे नितीन पाटील हे मेडीकल बंद घरुन घरी निघून गेले.

शेजारच्या दुकानदारामुळे प्रकार उघडले
नितीन पाटील यांना 21 रोजी सकाळी 9.30 वाजता शेजारील दुकानदार सिध्दार्थ रायमडे यांचा फोन आला. शटरचे कुलूप तुटलेले तर शटर अर्धवट उघडे असल्याचे त्यांनी सांगितले. यानुसार नितीन पाटील हे भरत पाटील व मेव्हण्यांसह घटनास्थळी मेडीकल आले. याठिकाणी मेडीकलमध्ये प्रवेश केला असता, काऊंटर लॉक तुटलेले तर त्यामधील 25 हजाराची रोकड गायब असल्याचे दिसून आले. चोरीची खात्री झाल्यावर त्यांनी वडीलांसह जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version