Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आगामी ईद शांततेत साजरे करावे; आयपीएस अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांचे आवाहन

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी ईद व येणारे सण सर्व धर्मीय लोकांनी शांततेत साजरे करावे समाजात शांतता भंग करणा-यांची नावे पोलिस प्रशासनाला कळवावे कायदा सुव्यवस्थेचा भंग होईल असे कोणतेही काम कोणीही करू नये असे आवाहन आयपीएस तथा पोलिस उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी केले आहे.

रावेर पोलिस स्टेशन तर्फे आयोजित सामाजिक एकता सर्व धर्म समभाव इफ्तार पार्टी निमित्त आयोजित कार्यक्रमात अन्नापूर्णा सिंग बोलत होत्या. यावेळी मौलाना गयासुद्दीन, मौलाना नजर यांनी रमजान महिन्याबद्दल माहिती दिली, तर पोलिस निरीक्षक डॉ. प्रदीप जयस्वाल यांनी आगामी ईद व इतर सण दरम्यान आयोजित मिरवणुकीवर अधिकचा खर्च करण्यापेक्षा गरजु विद्यार्थीना पुस्तके घेऊन द्यावे, समाज उपयोगी विधायक कामे करण्याचे आवाहन केले.

यावेळी इफ्तार पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष महेमुद शेख असदुल्लाह खान, शेख गयास, शेख सफुद्दीन, यूसुफ खान, शेख रफिक, अय्यूब मेंबर, शेख शफी सर, माजी नगराध्यक्ष हरिष गनवाणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर महाजन, माजी शहराध्यक्ष उमेश महाजन, अरुण शिंदे, सुधाकर महाजन, दिलीप कांबळे, ई. जे. महाजन, भावलाल महाजन, सुधाकर नाईक, अॅड. योगेश गजरे, कॉग्रेस शहराध्यक्ष संतोष पाटील, डी. डी. वाणी, अशोक गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शेख रईस यांनी केले.

Exit mobile version