Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव विकासो निवडणूकीत मविआ-भाजप आमनेसामने !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव विकासो निवडणूकीत उमेदवारी अर्ज माघारीनंतर महाविकास आघाडी आणि भाजपा आमने सामने असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विकासोच्या १३ जागांसाठी २९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या एकुण १३ जागांसाठी निवडणूक होत आहे. यात ८ जागा सर्वसाधारण, २ जागा महिला,२ एनटी आणि १ बीसी आरक्षण आहे. त्यानुसार १३ जागांसाठी ६९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माघारीच्या दिवशी एकुण २९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतले आहे. यात महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात आमनेसामने निवडणूक रंगणार आहे.

 

महाविकास आघाडीचे नेतृत्व शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी तथा राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन हे करीत आहेत. तर दुसरीकडे भाजपाच्या पॅनलचे नेतृत्व शिरीष बयस आणि अॅड. संजय महाजन हे करीत आहेत. विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीकडे धरणगाव पालिकेची रंगीत तालीम म्हणून देखील बघितले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळेच या निवडणुकीत मोठी आर्थिक उलाढाल होणार असल्याची देखील चर्चा आहे. विविध कार्यकारी सोसायटीसाठी ५ जून रोजी मतदान होणार असून त्याचदिवशी मतमोजणीला केली जाणार आहे.

Exit mobile version